धान-भरडधान्य खरेदीसाठी शासन आदेश शेतकऱ्यांना MSP लाभ मिळणार
भरडधान्य खरेदीसाठी राज्यात नवे मार्गदर्शक आदेश.

खास प्रतिनिधी / मुंबई
दि. ७ नोव्हेंबर२०२५
मुंबई प्रतिनिधी – खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेनुसार धान व भरडधान्य खरेदीसंदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागने दि. ४नोव्हेंबर 2025 रोजी आदेश काढला आहेकें केद्र सरकारने मंजूर केलेल्या MSP नुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी सुरू राहणार असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धान्य विकावे लागू नये यासाठी योजना राबवली जाणार आहे

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदुशेठ शर्मा यांनी सतत मार्केटिंग फिडरेशन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी वरिष्ठ पातळीवर शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.आणि पुढच्या आठवड्यामध्ये लवकरच खरेदी चालू होणारे असल्याचा शासनाने जीआर काढलेला आहे तरी शेतकऱ्यांनी सबुरीने त्यांचा माल विकावा माल विकण्याची घाई करू नये असे जाहीर आवाहन.बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पाटील प्रदेश महामंञी
असे असतील पीक MSP (₹/क्विंटल)दर
धान (Common) 2369
धान (A Grade) 2389
ज्वारी हायब्रिड 3699
ज्वारी मालदांडी 3749
बाजरी 2775
मका 2400
रागी 4886
शासन आदेशानुसार राज्यात धान व भरडधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ (FCI) कार्य पाहणार आहे.
कबनॉन-आदिवासी क्षेत्रात खरेदीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई
आदिवासी क्षेत्रात खरेदीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्याकडे देण्यात आली आहे.
खरेदी पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने BeAM प्लॅटफॉर्मवर होणार असून 7/12, आधार प्रमाणीकरण अनिवार्य राहणार आहे.
धान / भरडधान्य FA Q (Fair Average Quality) दर्जानुसारच खरेदी केली जाणार आहे. नॉन-FA Q मालेला खरेदी मान्यता नाही.


Best of lack
Thank you