सटाणा नगराध्यक्ष पदासाठी डाँ.विद्या सोनवणे यांच्या प्रचाराचा शूभारंभ.
देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात प्रचाराचा शुभारंभ.

सटाणा / प्रतिनिधी.दि. ७ नोव्हेंबर २५
सटाणा नगरपरिषद निवडणुक विषेश
सटाणा शहराच्या विकासासाठी स्वयंनिर्णय घेण्याची माझी क्षमता असून, सामाजिक कार्यातून शहरातील नागरिकांशी बांधिलकी निर्माण केली असल्याने आगामी सटाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत असल्याचे प्रतिपादन डाँ विद्या सोनवणे यांनी केले. शहरातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात आयोजित प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना डॉ. सोनवणे यांनी नाशिक व धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी पदावर असलेले माझे सासरे स्व. सुकदेव दोधुजी सोनवणे यांच्या प्रशासकीय अनुभवातून माझी जडणघडण झाल्याचे स्पष्ट करीत,
यापूर्वी सटाणा नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेविका असताना, शहरवासीयांच्या पिण्याचे पाणी सार्वजनिक स्वच्छता, सांडपाणी निर्मूलन अशा अपेक्षापूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून देखील मर्यादा आल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे डॉ. विद्या सोनवणे यांनी सांगितले. शहरवासीयांनी संधी दिल्यास प्रामुख्याने अवास्तव घरपट्टीवर तोडगा काढण्यासह भय व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही डॉ. सोनवणे यांनी यावेळी दिली.कार्यक्रमात डॉ. प्रकाश जगताप, काळू सोनवणे, प्रा. शांताराम गुंजाळ, विलास सोनवणे, वंदना सोनवणे, उषा वडजे, मोहिनी भामरे आदींनी मनोगत व्यक्त करताना, वैद्यकीय क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित व प्रभावी वकृत्वशैली असलेल्या डॉ. विद्या सोनवणे यांना नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून शहराचे नेतृत्व करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले. कार्यक्रमास वंदना भामरे, साधना पाटील, किरण सोनवणे, जनार्दन सोनवणे, भिका सोनवणे, रवींद्र सोनवणे, अशोक भामरे, अरुण सोनवणे, अशोक निकम, बी. डी. पाटील,
डी. पी. देवरे, अभय बुरड, रामदास पाटील, डॉ. अमोल पवार,मोहन सोनवणे, डॉ. राहुल सोनवणे डॉ. अमरनाथ पवार, डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. मनोहर सोनवणे, डॉ. राजेंद्र खैरनार,अॅड. अभिमन्यू पाटील, अॅड. यशवंत पाटील, अॅड. प्रशांत भामरे, सुनील देवरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

