शेतकऱ्यांसाठी ५,६६८ कोटींचा ‘कृषी समृद्धी’ निधी; ड्रोन-शेततळे-अवजारांसाठी मिळणार अनुदान
राज्य शासनाकडुन कृषी समृद्धी योजना 2025-26 राबवण्यास मान्यता.
प्रतिनिधी : मुंबई
शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २०२५
राज्य शासनाने कृषी समृद्धी योजना 2025-26 राबवण्यास मान्यता दिली असून तीन वर्षात एकूण ₹5,668 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी व पायाभूत कृषी सुविधा वाढविण्यासाठी ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेततळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन या आदी बाबींचा समावेश आहे.”
योजनेचा उद्देश
बळीराजाच्या उन्नतीसाठी गुंतवणूक
बदलत्या हवामान परिणामांना तोंड
अतिवृष्टीग्रस्तांना मदत.
योजनेतील चार प्रमुख घटक
1. BBF यंत्र (रुंद सरी वरंबा)
25,000 यंत्रांचा पुरवठा
किमतीच्या 50% किंवा कमाल ₹70,000 अनुदान
2. वैयक्तिक शेततळे
14,000 शेततळ्यास मंजुरी
काळी चिकणमाती जमीन प्राधान्य
₹16,869 ते ₹1,67,000 पर्यंत अनुदान
3. शेतकरी सुविधा केंद्रे
2,778 सुविधा केंद्रे उभारली जाणार
प्रकल्प खर्च ~ ₹3 कोटी
कमाल अनुदान मर्यादा ₹1.80 कोटी
मृद परीक्षण, जैविक खत center, गोडाऊन, शीतसाखळी, ड्रोन rentals — सर्व सुविधा एकत्र
4. मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन
5,000 ड्रोन अनुदानावर
कृषी पदवीधर: 50% किंवा ₹8 लाख
इतर लाभार्थी: 40% किंवा ₹4 लाख
अर्ज Mahadbt Portal वर
पाञता
कालावधी : 2025-26 ते 2027-28
अर्जदाराकडे सातबारा असणे आवश्यक
AgriStack Farmer Registration नंबर आवश्यक
Mahadbt वर ऑनलाईन अर्ज
पहिले येणारा – पहिले पात्र तत्त्व
शेतकरी / शेतकरी गट / FPO पात्र

