सटाणा नगर परिषदेतील नगरसेवक व थेट नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवारांची यादी सादर.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट.

सटाणा न्युज दि. ६ नोव्हेंबर.
प्रतिनिधी – सटाणा
आगामी सटाणा नगर परिषद निवडणुकीत १२ प्रभागातील २४ तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवारांची यादी, तसेच बागलाण तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गट आणि १४ पंचायत समिती गणांमधील संभाव्य उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना नाशिक येथे सादर करण्यात आली.
या भेटीत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र नाना पगार व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे उपस्थित होते.

गेल्या २५ वर्षांपासून सटाणा शहर आणि बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह घराघरात पोहोचले असून, महायुती झाली तर योग्य सन्मान मिळावा, असे मत पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसे न झाल्यास प्रत्येक जागेसाठी तीव्र चुरस असून, जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल व सर्व जाती-धर्मांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सटाणा नगर परिषद, जि.प. व पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला व राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा संकल्प तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अजित दादा पवार यांच्यासमोर व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते खेमराज कोर,फहिम शेख, संदिप वाघ, संदिप आबा भामरे, गायत्री कापडणीस, सुरेखा बच्छाव,दिंगबर सोनवणे, नंदराज देवरे, हेमंत मगर, रणधिर मोरे, अशोक भामरे, दिलीप खैरनार, हर्षद मगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष तुषार वाघ, भारत खैरनार, दादाजी खैरनार, दिलीप खैरनार, हर्षद मगर, आदी उपस्थित होते.

