संजीवनी शक्तीपाताचार्य श्री श्री भाऊनाथ महाराज उद्या सटाण्यात;
देव मामलेदार मंदिरात महाअभिषेक व वेद मंत्र जागर

प्रतिनिधी- सटाणा दि. 13
संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ, सातारा संस्थेच्या गुरुकुल ज्योतिष ज्ञान पीठाचे संजीवनी शक्तीपाताचार्य श्री श्री श्री भाऊनाथ महाराज हे उद्या रविवार (दि. १४ डिसेंबर २०२५) रोजी सटाणा येथे भेट देणार आहेत. यानिमित्त देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात श्रींचा महाअभिषेक, षोडशोपचारे पूजन, दर्शन व वेद मंत्र जागर आयोजित करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यात त्र्यंबकेश्वर येथील कीर्तन पाठशाळेचे ह.भ.प. श्री गोविंद महाराज हे बाल कीर्तनकारांसह नामसंकिर्तन सादर करणार असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री श्री भाऊनाथ महाराज यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री भालचंद्र आप्पा बागड यांनी दिली.
कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती श्री सुदर्शन मुळे, श्री मुकेश भट व सहकारी ब्रह्मवृंद पार पाडणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदर्शन मुळे, यशवंत सोनवणे, गणेश मोरे, जितेंद्र मोरे, प्रभाकर सोनवणे, सचिन बागुल, पप्पू मोरे, रोहित जाधव, सुजल खुटे यांच्यासह देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज मित्र मंडळ, गांधी चौकचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

