खासदार डॉ. निलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संकल्पनेतून रविवारी साल्हेर किल्ल्यावर भव्य स्वच्छता मोहीम.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर पर्यावरण संवर्धन व इतिहास जतनासाठी शिवभक्तांचा सहभाग.

साल्हेर | प्रतिनिधी दि. 22
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृतीसाठी भव्य अभियान राबवण्यात येणार असून, हे अभियान आपला मावळा संघटनेच्या वतीने व लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे.
शिवकालीन वारसा जतन, पर्यावरण संरक्षण व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन या उद्देशाने आयोजित या मोहिमेत आमदार जयंत पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमानिमित्त शनिवार, दिनांक २७ रोजी सायंकाळी खासदार डॉ. निलेश लंके यांच्यासह सुमारे ४०० ते ५०० शिवभक्त साल्हेर येथे मुक्कामी दाखल होणार असून, रविवारी सकाळी ७ वाजता साल्हेर किल्ल्यावर स्वच्छता अभियानास प्रारंभ होणार आहे.
या मोहिमेत मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुबेर जाधव.साल्हेर येथील मयुर भोये, मधुकर भोये, शांताराम मोरे, नानाजी शिंदे, भास्कर बच्छाव, हिरामण भोये, सुकलाल शिंदे, योगेश पवार, सुरेश पवार,नामदेव पवार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.
इतिहासाची साक्ष देणाऱ्या साल्हेर किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी हा ठेवा सुरक्षित राखण्यासाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना शिवभक्तांतून व्यक्त होत आहे.शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम यशस्वी करा असे आवाहन इंजि, कुबेर जाधव यांनी केले आहे.
असे आहे नियोजन
• रविवार, २८ डिसेंबर २०२५
• वेळ: सकाळी ७’वाजता
• स्थळ: किल्ले साल्हेर, ता. बागलाण (सटाणा), जि. नाशिक.
मुक्काम
• शनिवार दि २७
स्वयंसेवकांसाठी महत्त्वाच्या सूचना
नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी रात्रीचे जेवण, सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण उपलब्ध असेल
२७ डिसेंबर रोजी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
• अहिल्यानगर व पारनेर शहरातून बसची सोय उपलब्ध असून २७ डिसेंबर रोजी बस दुपारी ४ वाजता निघेल.
नोंदणीकृत व पूर्वसूचित स्वयंसेवकांनाच बसमध्ये प्रवेश मिळेल
• मुक्कामी येताना ब्लँकेट/चादर सोबत आणावी
• टी-शर्ट मिळालेल्यांनी तो परिधान करून यावे; इतरांसाठी अल्पदरात टी-शर्ट उपलब्ध
• वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे,
• मोहिमेच्या दिवशी
लोकनेते खासदार डॉ. निलेशजी लंके येत आहेत,
