ताजे अपडेट
मांगीतुंगी येथे दिगम्बर जैन सिद्धक्षेत्रात आजपासून याञेस सुरवात.
राज्यभरातील जैन बांधवाची हजेरी.

- बागलाण न्युज.
दि. ३ नोव्हेंबर
प्रतिनिधी- सटाणा
दिगम्बर जैन धर्मियांच्या मांगीतुंगी येथील पवित्र तीर्थावर दि. ३नोव्हेंबर पासून याञोत्सवास सुरवात होत आहे.धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्याबाईनगर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतून जैन बांधव पायी दिंडीने येथे मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याची माहीती मांगीतु़गी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर कुमार काले व महामंत्री उपेंद्र लाड यांनी दिली.
ही याञा पंचक्रोशीतील सर्वात मोठी याञा मानली जाते. या यात्रेस जैन बांधवांसोबतच आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याञेनिमित्त विविध खेळणीचे, खाद्यपदार्थाचे दुकाने तसेच पाळणे, तमाशा, कुस्ती दंगल आदी कार्यक्रम होत होत असल्याने या यात्रेला मोठी गर्दी होत असते.
तीन नोव्हेंबर रोजी राज्यभरातुन आलेले जैन बांधव ३५०० पायऱ्या चढत मांगी व तुंगी पर्वताची तीर्थयात्रा करतात.४ नोव्हेंबर रोजी पर्वतावर भव्य पंचामृत अभिषेक पार होऊन दुपारी चार वाजता चातुर्मासासाठी आलेल्या सर्व त्यागी वृंदाचा पिच्छी परिवर्तन कार्यक्रम होऊन सायंकाळी मंगलआरती व शास्त्रप्रवचन होणार आहे.५ नोव्हेंबर पौर्णिमेला सकाळी नऊवाजता मूलनायक पार्श्वनाथ भगव़ताची अभिषेक पूजन होईल तर दुपारी दोन वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य रथ मिरवणूक निघेल.
तसेच पांडुक शिलेवर प्राचीन परंपरेनुसार पंचामृत अभिषेक सम्पन्न होईल.या महोत्सवासाठी मुनिश्री 108 महिमासागरजी महाराज, मुनिश्री 108 दिव्यसेनजी महाराज, मुनिश्री 108 परमसागरजी महाराज तसेच आचार्या – माताजी यांचे मंगल सानिध्य लाभणार असून संपूर्ण विधिविधान मंत्रोच्चार विधानाचार्य पं. शैलेशभाई जैन करणार आहेत.
यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष अँड महेंद्र जैन, कोषाध्यक्ष मोहनभाई जैन, सहमंत्री वर्धमान पांडे, न्यायमूर्ती कैलाशजी चांदीवाल, प्रविण पहाडे, प्रमोद अजमेरा, किशोर शाह, रमेश गंगवाल, सतीशभाई, राजू बडजाते, प्रदीप ठोले आदींनी केले आहे.
