विज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
किकवारी मंडळात सप्टेंबर महिन्यात प्रचंड पाऊस. तरीही अनूदान नाही.
बागलाण न्युज.
दि ५नोव्हेंबर २०२५
प्रतिनिधी /सटाणा
बागलाण तालुक्यातील सप्टेंबर महीण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे किकवारी मंडळातील १७ गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसुनही नूकसान भरपाई मिळाली नाही.परीणामी अतिवृष्टी अनदान न मिळाल्याने स़तप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी मिञ बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडत जाब विचारत वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनूदान देण्याची मागणी केली. यावेळी विंचोरे येथील आबा शिंदे हेमंत बच्छाव, दिलीप गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, शांताराम गायकवाड, नानाजी सोनवणे, दिलीप बिरारी मोठाभाऊ ठाकरे, शरद भामरे आदीसह परीसरातील गावातील अनूदानापासुन वंचित राहीलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
किकवारी परीमंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळाली नाही.येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा न झाल्यास सतरा गावातील वंचित शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.बिंदुशेठ शर्माशेतकरी मिञ.
शासनाने ६५ मी मि पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या गावांचा अहवाल मागितला होता. किकवारी मंडळात ४५ मी मी पाऊस झाला होता. तरीही आपण शासनाकडे नुकसान अहवाल पाठविला शासनाकडुन नुकसान देण्याचे जाहीर केल्याने किकवारी मंडळातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाइई मिळणार.नरेंद्र महालेकृषी अधिकारी.

ईनसाईड स्टोरी
तालुक्यातील आकरा परीमंडळात पाण्याचे यंत्र मोजणी यंञ बसविण्यात आले आहेत. परंतु ज्या ठिकाणी यंञ बसविण्यात आले आहे. त्या ठिकाणी पाणी कमी पडला तर तीच नोंद त्या परीमंडळातील
सर्व गावांना लागु केला जातो.प्रजन्यमान यंञ असलेल्या गावात १८ गावांचा समावेश असतो . माञ यंञ बसविलेल्या गावात पाण्याचे प्रमाण कमी असले की याचा फटका इतरा गावांना बसतो.किकवारी परीमंडळात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी नुकसानीचे जीओ टँग फोटो काढुन ठेवले आहेत.
झालेल्या केवळ तांत्रिक कारणामुळे शेतकरी अडचणीत अनूदानापासुन वंचित राहतात. त्यामुळे प्रजन्यमापक यंञ अपडेट करणे किंवा प्रत्येक गावात ते बसविणे गरजेचे आहे.
