सटाणा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज.
10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारणार.

सटाणा नगरपरिषद निवडणूक विषेश
प्रतिनिधी – सटाणा.दि. ९नोव्हेंबर.
सटाणा नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज असून सोमवार पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासह 12 प्रभागातील 24 नगरसेवकांच्या निवडीसाठी दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत (रविवार सुट्टी वगळता) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.
छाननी – 18 नोव्हेंबर
माघारी – 19 ते 21 नोव्हेंबर
अपीलाची मुदत – 21 ते 25 नोव्हेंबर
चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान — 2 डिसेंबर रोजी शहरातील 41 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायं. 5.30
मतमोजणी – 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून त्याची प्रत्यक्ष प्रत नगरपरिषदेत सादर करणे आवश्यक आहे.
अपक्ष उमेदवारांसाठी 5 सूचक, तर पक्ष उमेदवारांसाठी 1 सूचक आवश्यक असून एकच व्यक्ती फक्त एका नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून सही करू शकते.शहरातील 3 संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.नगरपरिषदेचा कर थकबाकी असल्यास उमेदवारी अवैध ठरू शकते. त्यामुळे उमेदवारांनी सनपाचे ना देय प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी ज्योती भगत-(पाटील) यांनी दिली.

