बागलाण अकॅडमीत अमृत दुर्गोत्सवाचे आयोजन.
बागलाण अकॅडमीत मुलांनी साखारला साल्हेर दुर्ग.
प्रतिनिधी / सटाणा.
शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २५.
महाराष्ट्रातील बारा दुर्गांचा समावेश युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि शिवसंस्कृतीचा जागतिक जयघोष करणारा अमृत दुर्गोत्सव 2025 सध्या राज्यभर उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण व प्रबोधिनी अर्थात अमृत द्वारे हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे त्याचाच एक प्रेरणादायी भाग म्हणून सटाणा येथील बागलाण अकॅडमी येथे पार पडला या विशेष उपक्रमावर बागलाण अकॅडमी येथील मुलांनी दुर्ग बनवण्याच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन उत्कृष्ट असा दुर्ग उभा केला
या कार्यक्रमाचे संकल्पक विभागीय व्यवस्थापक माननीय मंगेश खाडिलकर, जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले यावेळी बागलान अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आनंदा महाले व राहुल महाले उपस्थित होते. मान्यवरांनी अमृत दुर्गोत्सव 2025 चे अभिनंदन करून मुला मुलींनी केलेल्या सर्जनशील प्रयत्नांचे कौतुक केले.. अमृत दुर्गोत्सव 2025 चा हेतू महाराष्ट्राच्या गडदुर्गांच्या परंपरेचा अभिमान जागवणे आणि नव्या पिढीत स्वराज्याची भावना रुजवणे हा आहे.तयार केलेल्या दुर्गा सोबत फोटो घेऊन www.durgotsav.com या वेबसाईटवर अपलोड केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त होते. लक्षित संख्या गाठल्यावर ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही नोंद होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अमृततर्फे करण्यात आले..या प्रेरणादायी उपक्रमामुळे मुलामुलींच्या चेहऱ्यावर अभिमान आनंद आणि आत्मविश्वासाची झलक पहायला मिळाली
महाराष्ट्रातील बारा दुर्गांचा समावेश हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अभिमानाचा आणि शिवसंस्कृतीचा जागतिक जयघोष करणारा अमृत दुर्गोत्सव 2025 सध्या राज्यभर उत्साहात साजरा होत आहे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण व प्रबोधिनी अर्थात अमृत द्वारे हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे त्याचाच एक प्रेरणादायी भाग म्हणून सटाणा येथील बागलाण अकॅडमी येथे पार पडला या विशेष उपक्रमावर बागलाण अकॅडमी येथील मुलांनी दुर्ग बनवण्याच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन उत्कृष्ट साल्हेर दुर्ग उभा केला.


