आपला जिल्हारोजगार/शिक्षण
महाबँक आर-सेटी मार्फत ६ नोव्हेंबर पासुन मोफत प्रशिक्षण
पशूपालनासह फास्ट फूडसह विविध प्रशिक्षणाचा समावेश.
प्रतिनिधी / नाशिक
- महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्थेमार्फत दि.६ नोव्हेंबर पासून विविध प्रशिक्षण सुरु होत आहे. बारा दिवसाचे हे प्रशिक्षण सपुर्ण मोफत राहणार असुन पाञ लाभार्थानी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबँक आरसेटी नाशिकचे संचालक गणेश सरोदे, प्रशिक्षक राजेंद्र पवार, समीर कूलकणीॅ यानी केले आहे.. या प्रशिक्षणात फास्ट फूड स्टाॅल उद्यमी प्रशिक्षणांतर्गत चाट चे विविध प्रकार, चायनीज डिशेस ,आदीसह विविध प्रकारच्या खाद्य पदार्थासह उद्योग व्यवसाय उभारणी, व्यक्तीमत्व व उद्योजकीय विकास, प्रत्यक्ष युनिट भेट, प्रकल्प भेट, शासकीय व बॅक चे विविध कर्ज व अनुदान योजना, माकॅटीग मॅनेजमेन्ट , पॅकेजिंग आदी विषयावर तज्ञामार्फत मार्फत मार्गदर्शन होणार आहे.तसेच कृषी उद्यमी प्रशिक्षणांतर्गत,कुक्कुटपालन, शेळीपालन ,दृग्धव्यवसायाचे प्रशिक्षण दि १० नोव्हेंबर पासून सूरू होणार आहेत.या प्रशिक्षणात पशुपालन ,गोट शेड चे बाधकाम, खाद्य नियोजन व व्यवस्थापन, आजार व औषध व्यवस्थापन,ग्राहक व्यवस्थापन, शासकीय योजना बॅक कर्ज, व अनुदान प्रकल्प अहवाल तयार करणे आधीबाबत माहिती मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ४५ वर्ष वयाच्या आतील सातवी पास,नापास असलेल्या पाञ लाभार्थानी शाळा सोडल्यास दाखला,आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबूक, जात प्रमाणपत्र, फोटो,आधी कागदपत्रासह महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोवर्धन ग्रामपंचायत जवळ, गोवर्धन गाव, गंगापुर, नाशिक मोबाईल क्रमांक 9890383894, 7820890073, 8237861727 ह्य नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.