आरोग्य

राज्यात कुष्ठरोग आता ‘नोटिफायबल डिसीज.

२०२७ पर्यंत “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट

मुंबई दि.१ – राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ घोषित केले आहे. यानुसार कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा ,कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आत सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे.

कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, परिघीय नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. लवकर निदान न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती (दर्जा २ डिसॅबिलिटी) निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.राज्य शासनाने सन २०२७ पर्यंत “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र” हे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे. कुष्ठरोग नियंत्रणासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी निदान झालेल्या सर्व रुग्णांचा योग्य उपचार, पाठपुरावा तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (पीईपी) देणे आवश्यक आहे.सद्यसस्थिती सप्टेंबर २०२५ अखेर राज्यात ७,८६३ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून उपचाराखालील रुग्णांची संख्या १३,०१० आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना कुष्ठरोग निदान व नोंदणीसंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

        आरोग्य विभाचे आवाहन

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनीही कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये, लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो—फक्त वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहे.

शेअर करा

Ramesh Desale

साप्ताहिक आपला मराठा मावळा हे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, घडामोडी तसेच , स्थानिक समस्या. डिजीटलच्या माध्यमातून जनतेच्या भावना आणि आवाज बुलंद करण्यासाठी एक लोकाभिमुख वृत्तपत्र आहे.आमचे ध्येय सत्य, निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी पत्रकारिता करणे हे आहे.येथे दररोजच्या महत्वाच्या बातम्या, विशेष अहवाल, सामाजिक उपक्रम, राजकीय व गावोगावच्या घडामोडींची माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घटना किंवा विशेष उपक्रम आम्हाला WhatsApp -7350753192, 9975747208, या क्रमांकावर किंवा rameshdesale52@gmail.com वर पाठवा योग्य आणि सत्य बातम्यांना प्रसिद्धी दिली जाईल. रमेश देसले. संपादक आपला मराठा मावळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका