अपघातआपला जिल्हागुन्हेगारी
डोंगराळे घटनेचा ठेंगोडा येथे तीव्र निषेध.आरोपीस फाशीची मागणी.
ग्रामस्थांची कँडल मार्च काढीत निष्पाप बालिकेस श्रद्धांजली.

प्रतिनिधी- सटाणा
गुरुवार दि.२०
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय निरागस चिमुरडीवर अत्याचार करून तिची अमानुष निघृण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुक्यातील ठेंगोडा ग्रामस्थांच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करीत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

मन हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दि. २० रोजी ठेंगोडा ग्रामस्थांच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ बंद ची हाक देण्यात आली. ग्रामस्थासह महीला पुरुष व सर्वपक्षीयांनी एकञ येत कँडल मार्च काढुन निष्पाप बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी झालेल्या निषेध सभेत महीला व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनेचा कडक शब्दात समाचार घेत
निषेध नोंदविला. सदर घटनेची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवुन आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदलाल आहीरे, वसंत शिंदे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना खैरनार, प्रज्ञा पगार, आधींच्या वतीने करण्यात आली.यावेळी सरपंच भारती वाघ, उपसरपंच दौलत पगार सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी, सदस्य, महीला, पुरुष, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..


