ताजे अपडेट

सटाणा येथील आदिवासी मुलींचा कळवण प्रकल्पावर पायी मोर्चा.

आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्तक्षेपामुळे मोर्चा स्थगिती.

प्रतिनिधी- सटाणा सोमवार दि. १०
सटाणा  येथील नामपूर रोड जवळील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील प्रशासनाकडून विद्यार्थीनीनी आपल्या विविध अडचणी सोडविण्याबाबत कळवण प्रकल्प कार्यालयात पञ पाठविले होते. माञ सदर पञाबाबत कार्यवाही न झाल्याने अखेर सतप्त २३० विद्यार्थीनींनी रविवार दि. ९ रोजी  कळवण प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले अखेर आमदार दिलीप बोरसे यांनी प्रकरणाचे गाभिर्य ओळखत  सामाजिक कार्यकर्ते व संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्याने अखेर  बुधवार पर्यंत प्रश्न मार्गी लावण्याच्या अटीवर तात्पुरता मोर्चा स्थगित करण्यात आला.
२५० क्षमतेच्या या वसतिगृहात आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसून विशेषतः गृहपाल नसल्यामुळे विद्यार्थिनींना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मागणीसंदर्भात वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत  नसल्याने विद्यार्थिनींनी थेट मोर्चाचे अस्ञ उपसले.
या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने यांना तातडीने घटनास्थळी पाठवत आंदोलक  विद्यार्थिनींसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. कळवणचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अनुकूरि नरेश , साबळे यांनी विद्यार्थिनींशी  चर्चा करत चार दिवसांत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.अचानक निघालेल्या या मोर्चामुळे आदिवासी विभाग तसेच प्रशासनात मोठी हालचाल पाहायला मिळाली. शेवटी सकारात्मक तोडगा निघाल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.या मध्यस्थीत स्थानिक
 पत्रकार भगवान पवार, वैभव माळी, वैभव नंदाळे यांनी मध्यस्थी करीत  महत्त्वाची भूमिका बजावली.
आदिवासी वस्तीगृहाच्या गृहपालांची बदली व इतर  मागण्यासाठी २३० मुलींनी कळवण प्रकल्प कार्यालयात पायी मोर्चा नेला होता.याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी प्रकरणाची चौकशी करुन मार्ग काढण्याच्या सुचना केल्याने हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ थाबवून प्रत्यक्ष भेटून चर्चा केली यावेळी कळवणचे प्रकल्प विकास अधिकारी  साबळे व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 
 बुधवारपर्यंत  मागण्या मंजूर करून प्रकरण मार्गी लावल्याचे सांगितल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला.
            श्याम बगडाने. 
     अशासकीय सदस्य.
  महिला बालविकास समिती.
येथील गृहपाल पगार यांची बोरगाव येथे प्रमोशनवर बदली केल्याने त्यास विरोध करीत विद्यार्थीनींनी हा मोर्चा काढला होता. या व्यतिरिक्त कोणतीही तक्रार नव्हती. बुधवार पर्यत पगार यांना पुर्ववत नियुक्ती करण्यात येईल 
              रविंद्र साबळे 
     प्रकल्प अधिकारी कळवण 
शेअर करा

Ramesh Desale

आपला मावळा मराठा हे Digital Media Portal आहे. या वेबसाईटवरील बातम्या, फोटो, व्हिडीओ, माहिती ही आमच्या Reporter / Ground Coverage / अधिकृत स्त्रोत / प्रेस नोट / सार्वजनिक उपलब्ध स्रोत यावर आधारित असते.बातम्यांमधील मते, मतप्रदर्शन, विधाने किंवा दावे हे संबंधित व्यक्तींचे / स्त्रोतांचे असतात. अशा मतांसाठी या वेबसाईटची संपादकीय टीम थेट जबाबदार नाही.आरोप / तक्रार / जनहित माहितीबाबत — संबंधित विभाग / संस्था / अधिकारी / व्यक्ती कडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला जातो. चूक अथवा सुधारणा असल्यास वाचक आम्हाला कळवू शकतात — आम्ही त्या दुरुस्तीची नोंद करू. या वेबसाईटवरील माहिती अधिकार दावा, कायदेशीर पुरावा किंवा अंतिम निष्कर्ष म्हणून वाचली जाऊ नये. बातम्या वाचकांसाठी माहिती स्वरूपात प्रकाशित केल्या जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका