प्रधानमंत्री पीक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन
31 मार्च 2026 अंतिम मुदत.
नाशिक :दि. ३१ जिमाका वृत्तसेवा
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुसकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगाम 2026-26 करिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्ताल पुणेचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.रब्बी हंगाम 2025-26 साठी गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा या सहा अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रातून शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) साठी सहभागाची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 अशी आहे. रब्बी कांदा या पिकासाठी 15 डिसेंबर 2025, तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता 31 मार्च 2026 ही सहभागी होण्याची अंतिम मुदत आहे.कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत
योजनेत सहभागी होण्याठी विहीत नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोदंणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
पीक विमा योजनेत सहभागासाठी शेतकरी स्वत: पोर्टलवर नोंदणी करू शकतात अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप अथवा सामूहिक सेवा केंद्रामार्फत सहभाग नोंदवू शकतात.
भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400059 हि विमा कंपनी नाशिक जिल्ह्यासाठी नियुक्त केली आहे. कंपनीचा मेल आडी pikvima@alcoindia.com असा आहे.