ओपनएआयचा मोठा निर्णय : “ChatGPT Go” भारतात एक वर्ष मोफत.
ऑफरमुळे महीण्याला ₹३९९ चा फायदा

नवी दिल्ली दि. ३नोव्हेंबर २५
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अग्रगण्य कंपनी ओपनएआयने त्यांचा “ChatGPT Go” सबस्क्रिप्शन प्लॅन भारतातील वापरकर्त्यांसाठी एका वर्षासाठी मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही ऑफर भारतीय वापरकर्त्यांसाठी ४ नोव्हेंबर २०२५ पासून लागू राहणार आहे.
सध्या या प्लॅनची भारतातील किंमत ₹३९९/महिना आहे. म्हणजेच, या ऑफरमुळे भारतीय वापरकर्त्यांना वर्षभरात ₹१४,७८८ इतका थेट फायदा मिळू शकतो. “Go” प्लॅनमध्ये अधिक चॅट क्रेडिट्स, इमेज जनरेशन व अॅडव्हान्स मेमरीची सुविधा आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ChatGPT Go ही OpenAI ची मिड-टियर प्रीमियम योजना असून भारत हा ओपनएआयसाठी दुसरा सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढणारा बाजार आहे.
इतर कंपन्यांचाही दबाव
एआय प्लॅटफॉर्ममध्ये गुगल व Perplexity कडून दिल्या जाणाऱ्या मोफत ऑफर्सनंतर ओपनएआयने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते.
गुगलने अलीकडे त्यांच्या एआय प्रो सदस्यत्वाची (₹१९,५०० वार्षिक) योजना विद्यार्थ्यांसाठी मोफत केली होती. तसेच Perplexity ने एअरटेलसोबत भागीदारी करून प्रीमियम मोफत देण्याची घोषणा केली आहे.
ओपनएआय नेतृत्वाचा प्रतिसाद.
“भारतात ChatGPT Go लाँच झाल्यापासून वापरकर्त्यांच्या सर्जनशीलतेचा वेग आश्चर्यकारक आहे. त्यामुळे डेव्हडे एक्सचेंजपूर्वी आम्ही ही योजना एका वर्षासाठी मोफत करत आहोत. जेणेकरून अधिक लोक प्रगत AIचा फायदा घेतील.”
सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही स्पष्ट केले की : “भारत हा आमचा केवळ दुसरा सर्वात मोठा बाजार नाही, तर सर्वात वेगाने वाढणारा बाजार आहे.
”ChatGPT Go : काय मिळणार?
सुविधा व तपशील
Unlimited messages कोणतेही daily cap नाही
Image Generation अधिक प्रतिमा तयार करता येतील Long Memory पूर्वीच्या संभाषणांचा दीर्घकालीन वापर
GPT-5 पॉवर्ड सर्वात प्रगत AI वर आधारित अनुभव.
आता किंमत किती? नफा किती?
सध्याची किंमत : ₹३९९/महिना
मोफत कालावधी : १ वर्ष (४ नोव्हेंबरपासून)संभाव्य फायदा : ₹१४,७८८ विद्यमान subscribers ना देखील याचा लाभ मिळणार आहे (क्रेडिट/रिफंड)
साइनअप कसा करायचा?
१) OpenAI ची अधिकृत वेबसाइट किंवा अॅप ओपन करा
२) ४ नोव्हेंबरनंतर लॉगिन/नवीन खाते करा
३) भारतीय लोकेशन कन्फर्म करा
४) फायदे आपोआप अॅक्टिव्ह होतील.
हे गेम चेंजर का?
विद्यार्थी : असाइनमेंट, कोडिंग, इमेज डिझाईन सोपे बिझनेस : ग्राहक सेवा आणि productivity वाढ कंटेंट क्रिएटर : जास्त Image gen → जलद आउटपुट
छोटे शहर/गाव – AI अॅक्सेस वाढणार
कंपनीने म्हटले आहे की या ऑफरमुळे भारतात AI चे लोकशाहीकरण अधिक गतीने होईल.
				
					
