ताजे अपडेट

नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.

उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी.

मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025

नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या वतीने गुरूवार 6 नाव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबकरोड, नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले कळविल आहे.

या मेळाव्यात एकूण 739 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नोकरी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, डिल्पोमा, बीएससी, बीई, डिप्लोमा सर्व ट्रेड, पदवीधर यांना सहभागी होता येणार आहे.

१४ पेक्षा जास्त नामांकित कंपन्याचा सहभाग

मेळाव्यात स्पार्क एचआर सोल्युशन, नाशिक, जेके मैनी प्रीसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, हिटाची अस्टेमो इंडिया प्रायव्हेट लि., बजाज सन्स लि., एमडी इंडस्ट्रीज / एमडी ऑटो कंपोनंट, एमएसएल ड्राईव्हलाईन सिस्टिम लि., मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग, सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रा.लि., नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि, वैष्णवी ऑटो (पी) लि, धुमाळ इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्वीगी लि. अशा एकूण-१४ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या आयोजित मेळाव्यात सहभागी होवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,

वि. रा. रिसे  

 सहाय्यक आयुक्त   

 

शेअर करा

Ramesh Desale

आपला मावळा मराठा हे Digital Media Portal आहे. या वेबसाईटवरील बातम्या, फोटो, व्हिडीओ, माहिती ही आमच्या Reporter / Ground Coverage / अधिकृत स्त्रोत / प्रेस नोट / सार्वजनिक उपलब्ध स्रोत यावर आधारित असते.बातम्यांमधील मते, मतप्रदर्शन, विधाने किंवा दावे हे संबंधित व्यक्तींचे / स्त्रोतांचे असतात. अशा मतांसाठी या वेबसाईटची संपादकीय टीम थेट जबाबदार नाही.आरोप / तक्रार / जनहित माहितीबाबत — संबंधित विभाग / संस्था / अधिकारी / व्यक्ती कडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला जातो. चूक अथवा सुधारणा असल्यास वाचक आम्हाला कळवू शकतात — आम्ही त्या दुरुस्तीची नोंद करू. या वेबसाईटवरील माहिती अधिकार दावा, कायदेशीर पुरावा किंवा अंतिम निष्कर्ष म्हणून वाचली जाऊ नये. बातम्या वाचकांसाठी माहिती स्वरूपात प्रकाशित केल्या जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका