आपला जिल्हारोजगार/शिक्षण

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती मंगळवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर.

ञिभाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करावी.याबाबत होणार धोरण निश्चित.

 

नाशिक – प्रतिनिधी.

दि. ८  नाव्हेंबर, 2025

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी व त्रिभाषा सूत्र राज्यात कोणत्या इयत्तेपासून सुरू करावयाचे याबाबत धोरण निश्चितीसाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह,के.टी.एच.एम महाविद्यालयाच्या शेजारी, गंगापुर रोड येथे समिती नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी उपस्थित राहील. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संलग्न संबंधित शासकीय, अशासकीय संस्थाचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक, शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, संस्था प्रतिनिधी यांनी नियोजित स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, नाशिकचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या समितीतअध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. जाधव यांच्यासह माजी भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अर्पणा मॉरिस,डेक्कन कॉलेज पुणेच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनल कुलकर्णी-जोशी, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ. मयुश्री सावजी, बाल मानसतज्ज्ञ, पुणे डॉ.भूषण शुक्ल हे सदस्य आहेत. राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबईचे संजय यादव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

नागरिकांसाठी आपली मते/ विचार व्यक्त करण्यासाठी समितीच्या https://tribbhashasamiti.mahait.org या संकेस्थळावर नोंदवावी.

शेअर करा

Ramesh Desale

आपला मावळा मराठा हे Digital Media Portal आहे. या वेबसाईटवरील बातम्या, फोटो, व्हिडीओ, माहिती ही आमच्या Reporter / Ground Coverage / अधिकृत स्त्रोत / प्रेस नोट / सार्वजनिक उपलब्ध स्रोत यावर आधारित असते.बातम्यांमधील मते, मतप्रदर्शन, विधाने किंवा दावे हे संबंधित व्यक्तींचे / स्त्रोतांचे असतात. अशा मतांसाठी या वेबसाईटची संपादकीय टीम थेट जबाबदार नाही.आरोप / तक्रार / जनहित माहितीबाबत — संबंधित विभाग / संस्था / अधिकारी / व्यक्ती कडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला जातो. चूक अथवा सुधारणा असल्यास वाचक आम्हाला कळवू शकतात — आम्ही त्या दुरुस्तीची नोंद करू. या वेबसाईटवरील माहिती अधिकार दावा, कायदेशीर पुरावा किंवा अंतिम निष्कर्ष म्हणून वाचली जाऊ नये. बातम्या वाचकांसाठी माहिती स्वरूपात प्रकाशित केल्या जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका