भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारीत व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय — सचिव तुकाराम मुंढे
चॅटबॉट योजनांची माहिती, तक्रारी नोंदविणे व तक्रारींचे ‘सेल्फ-ट्रॅकिंग’ सुविधा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
प्रतिनिधी – मुंबई
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२५
— दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तींना सुविधा देण्यासाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट सुरु केला आहे. 7821922775 या नंबरवर उपलब्ध असलेला हा चॅटबॉट योजनांची माहिती, तक्रारी नोंदविणे व तक्रारींचे ‘सेल्फ-ट्रॅकिंग’ यासारख्या सुविधा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतो, असे सचिव तुकाराम मुंढे यांनी सागितले.
चॅटबॉटमध्ये भाषिणी (speech-to-text) तंत्रज्ञान वापरले गेले आहे; ज्यामुळे टाईप करणे अशक्य असणारे किंवा अडचणीशी जुळणारे व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजीत आवाजात रेकॉर्ड करून पाठवू शकतील.
हा चॅटबॉट राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती त्वरीत देण्यास सक्षम आहे आणि तक्रारींचे स्वतःचे वर्गीकरण (auto-classification) करून संबंधित अधिकाऱ्याकडे पुढे पाठवतो.
तक्रारींचा सद्यस्थिती तपास थेट व्हाट्सॲपवर करता येणार आहे (सेल्फ-ट्रॅकिंग), ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना सहज अपडेट मिळतील.
संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत तक्रारीची दखल घेणे बंधनकारक करण्यात आले आहे; तसेच विभागाने तक्रार निवारणासाठी विशेष डॅशबोर्ड उपलब्ध करून दिला आहे.
हा उपक्रम शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विकसित केला गेला असून विभाग साप्ताहिक पातळीवर सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहे.
“या चॅटबॉटमुळे दिव्यांगांना योजनांची माहिती आणि तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि समावेशक होईल. आवाजावरून तक्रार नोंदी केल्याने अनेकांना मदत होणार आहे.”
तुकाराम मु़डे सचिव
अधिक माहिती / तक्रार नोंदविण्यासाठी: व्हाट्सॲप नंबर — 7821922775

